नवी मुंबई : मुंबईसह नवी मुंबई (Navi Mumbai) शहराला बराच सागरी किनारा लाभला आहे. नवी मुंबईचा विचार करता 144 किमीची सागरी हद्द शहराला आहे. पण याच हद्दीची सुरक्षा गेल्या अनेक महिन्यांपासून राम भरोसे पडली आहे. कारण पोलिसांना (Navi Mumbai Police) या हद्दीवर गस्त घालण्यासाठी देण्यात आलेल्या सातही बोटी नादुरूस्त अवस्थेत असल्याने सागरात गस्त घालायची कशी? असा प्रश्न पोलीस कर्मचार्यांना पडला आहे.


मुंबईत 26/11 चा महाभयानक दहशतवादी हल्ला (26/11 Terror Attack) हा समुद्रामार्गेच झाला होता. समुद्रातून दहशतवादी मुंबईत आले होते. त्यानंतर 2016 साली उरण परिसरातही दहशतवादी घुसल्याच्या माहितीवरून मिलेट्री फोर्सेस तैणात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे समुद्रातून कोणीही, कधीही येण्याची शक्यता असूनही याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सागरी किनाऱ्याला लागून ओएनजीसी प्रकल्प, जेएनपीटी बंदर, घारापुरी बेल्ट, बाबा अनुसंधान केंद्र असे संवेदनशील प्रकल्प अशतानाही सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या सगळ्यासह खाडीलगतच्या भागात वाळू तस्करी, डिझेल तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र गस्त घालायला पोलीसांकडे बोटीच नसल्याने आरोपींना याचा फायदाच होत आहे. दरम्यान अशाप्रकारचे गुन्हे रोखण्यासह कोणतातरी मोठा गुन्हा घडण्याआधी प्रशासनाने पोलिसांना योग्य साहित्य पुरवून सुरक्षेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करुन मार्ग काढणे अत्यंत गरजेचे आहे.


हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha