नवी मुंबई : नवी मुंबईच्या सीवूड परिसरात एकाच कुटुंबातील दहा जणांना विषबाधा झाली आहे. मात्र जेवणातून पतीनं विष देऊन माहेरच्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पत्नीनं केला आहे.


पत्नीच्या आरोपानंतर पती विजय मुंढेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या सर्व जणांवर वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सीवूडच्या साईमहेल सोसायटीत रत्ना मनसुख आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांच्यासोबत त्यांची विवाहित मुलगीही राहते. वादविवादामुळे हे दोघेही 4 वर्षांपासून वेगवेगळे राहतात.

मनसुख कुटुंब 5 तारखेला नातेवाईकाच्या विवाहानिमित्त जुन्नरला गेले होते. मात्र उशिरा घरी येऊन जेवण केल्यानंतर घरातल्या सर्व सदस्यांना उलट्या झाल्या. त्यानंतर स्वयंपाकातील डबे तपासले असता हिरवट पदार्थ दिसून आला.

विशेष म्हणजे घरातील सोनं आणि महत्त्वाची कागदपत्रं गायब झाल्याचा आरोपही विजय मुंढेंच्या पत्नीनं केला आहे.