नवी मुंबई : नवी मुंबईतील शिवसेनेच्या दोन नगरसेवकांची पदं रद्द करण्यात आली आहेत. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही कारवाई केली आहे. शिवराम पाटील आणि अनिता पाटील अशी या नगरसेवकांची नावं आहेत.
शिवराम पाटील हे नवी मुंबई मनपाचे स्थायी समितीचे सभापती आहेत. तर त्यांच्या पत्नी अनिता पाटील या नगरसेविका आहेत. अनधिकृत बांधकामप्रकरणी तुकाराम मुंढेंनी त्यांना दणका दिला आहे. अनिता पाटील या वॉर्ड क्रमांक 39 तर शिवराम पाटील हे वॉर्ड क्रमांक 40 मधील नगरसेवक आहेत.
शिवराम पाटील यांच्या कोपरखैराणे इथल्या हॉटेलच्या बांधकामात अनियमितता आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या हे हॉटेल त्यांच्या मुलाच्या नावावर आहे. मात्र या कारवाईनंतर शिवसेना आणि मुंढे यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.