मुंबई: राज्याच्या मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे स्थान अधिकृतपणे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलं आहे. याबाबत सरकारने शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनंतर आता चंद्रकांत पाटील महत्त्वाच्या स्थानी असतील.

यापूर्वी माजी मंत्री एकनाथ खडसे हे दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र विविध आरोपांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर, त्यांच्याकडील महत्त्वाचं महसूल खातं, चंद्रकांत पाटील यांच्याकडेच सोपवण्यात आलं. त्यानंतर आता त्यांचं दुसऱ्या क्रमांकाचं स्थानही अधिकृतरित्या चंद्रकांत पाटलांनाच मिळालं आहे.

आता विधानसभेतही चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारील जागा असेल. यापूर्वी खडसे या जागी बसत.

याआधी विधानसभेत चंद्रकांत पाटील यांचे नववे स्थान होते. यापूर्वी परिषदेतील सभागृह नेता म्हणून चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाली आहे.

आता मंत्रिमंडळ बैठक आणि विधानसभेतही चंद्रकांत पाटील यांच्याकडे दुसऱ्या क्रमांकाचे स्थान असेल.