नवी मुंबई : कोरोना महामारीमध्ये सर्वत्र परिस्थिती आव्हानात्मक बनली आहे. नवी मुंबई शहरही त्याला अपवाद नाही. या शहरात कोरोनाविषाणूची साखळी खंडित करण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या समजावून घेण्यासाठी यापुढे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी 24 तास ऑन ड्युटी राहणार आहेत, असे नवी मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी आज येथे जाहीर केले.


माझी सुट्टी आहे, कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे, हा ऑफिस टाईम नाही, या सबबी यापुढे चालणार नाहीत. कामचुकारपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. आयुक्तांनी जाहीर केलेल्या नव्यात पॅटर्नमुळे पालिकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.


सध्याची परिस्थिती ही युद्धा सारखी आहे. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना भरपूर काम करावे लागेल. तशा सूचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत. काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मागे प्रशासन खंबीरपणे उभे राहणार आहे. टोलवाटोलवी करणाऱ्यांना मात्र पाठीशी घातले जाणार नाही. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी कोरोना व्हायरसला समजावून घेणे आवश्यक आहे. काय खबरदारी घ्यायला पाहिजे, प्रत्येकाची महत्त्वाची जबाबदारी काय आहे, याबाबत महापालिका प्रशासन मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये जनजागृती करणार असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.


Mumbra | मुंब्र्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे?


जास्तीत जास्त रुग्णांचा शोध घेणार
शहरांमध्ये जे भाग कोरोना हॉटस्पॉट म्हणून ओळखले गेले आहेत, तेथे जास्तीत जास्त रुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे. रुग्ण जरी वाढले तरी मृत्यूचा दर आटोक्यात ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करणार आहे. रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी ऑक्सिजनच्या बेडची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे.


महत्वाची कामे सुरू राहणार
महापालिका प्रशासनाने सध्या सर्व लक्ष कोरोनावर केंद्रित केले असले तरी अन्य विकासकामांवर त्याचा परिणाम होणार नाही. जी कामे आवश्यक आहेत आणि जी कामे पाणीपुरवठ्याची संबंधित आहेत. त्यांनाही प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती बांगर यांनी यावेळी दिली.


Special Report | लक्षण नसलेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाचा धोका, सेरोसर्व्हीलन्स चाचणीचा अहवाल