नवी मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल प्रवाशांना आज (27 डिसेंबर) आणि उद्याही (28 डिसेंबर) मनस्ताप सहन करावा लागणार आहे. कारण हार्बर लाईनवर दोन दिवसांचा तातडीचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
बेलापूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर दुरुस्तीचं काम सुरु आहे. त्यामुळे हा विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे काही लोकल गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. तर काही गाड्या उशिराने धावणार आहेत.
खरंतर मागील चार ते पाच दिवसांपासून हार्बर मार्गावरील प्रवाशांना या ना त्या कारणामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. उरण मार्गाच्या नुतनीकरणासाठी घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे नेरुळ ते पनवेल ही सेवा पूर्णपणे ठप्प होती. पण ही सेवा सोमवारी रात्री सुरु झाली.
रडवणारी हार्बर, रखडणारी लोकल, रोजचीच मर-मर!
मात्र मंगळवारी सकाळी बेलापूर स्टेशनमधील ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल पाच ते सहा तासांनी या मार्गावरील वाहतूक सुरु झाली.
त्यात आणखी भर म्हणून आज आणि उद्या दुरुस्तीच्या कारणामुळे तातडीने मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांचे आणखीच हाल होणार आहेत.
दरम्यान, मेगाब्लॉक असल्याने काही गाड्या रद्द केल्या असून काही गाड्या उशिराने धावणार आहेत. पण वाहतूक पूर्णपणे बंद नसेल, असं रेल्वेतर्फे सांगण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या
तब्बल पाच तासानंतर हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरळीत
हार्बर रेल्वे ठप्प, अधिकारी जापनीज लोकांसोबत हेरिटेज पाहण्यात व्यस्त
हार्बर मार्गावर आज 13 तासांचा मेगाब्लॉक, 100 फेऱ्या रद्द
हार्बर रेल्वेवर तीन दिवसांचा मेगाब्लॉक, विशेष बसची सोय
हार्बर मार्गावर दोन दिवसांचा मेगाब्लॉक, प्रवाशांचा मनस्ताप कायम
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई
Updated at:
27 Dec 2017 08:15 AM (IST)
खरंतर मागील चार ते पाच दिवसांपासून हार्बर मार्गावरील प्रवाशांना या ना त्या कारणामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -