मुंबई: 'मुख्यमंत्री हे लोकशाही पाळणारे आहेत. त्यामुळे मला राजीनामा देण्याची वेळ येणार नाही.' असं म्हणत नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे तुकाराम मुढेंच्या निर्णयाबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे. आज महापौर आणि सर्वपक्षीय नगरसेवकांच्या शिष्ट मंडळानं मुख्यमंत्र्यांची 'वर्षा'वर भेट घेतली.
'वर्षा'वर झालेल्या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अविश्वास ठरावाबाबत चर्चा झाली असून शिष्ट मंडळाने मुख्यमंत्र्यांना तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी करणारे पत्र दिलं आहे.
याबाबत बोलताना महापौर सुधाकर सोनावणे म्हणाले की, 'आम्ही याआधी वेळ मागितली नव्हती. भेटीसाठी आजच वेळ मागितली आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ दिली. आमची भेट सकारात्मक झाली. त्यामुळे आम्ही आशावादी आहोत. तसंच लोकशाहीवर आणि मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे.'
'आम्ही दिवाळीनिमिताने मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यामुळे याविषयी आता बोलणं योग्य नाही. आम्ही घेतलेल्या निर्णयाची प्रत फक्त त्यांना दिली आणि त्याबाबत चर्चा केली. मुख्यमंत्री हे लोकशाही पाळणारे आहेत. त्यामुळे मला राजीनामा देण्याची वेळ येणार नाही.' असंही महापौर सुधाकर सोनावणे म्हणाले.
दरम्यान, आज महापौर सुधाकर सोनवणे यांनी ‘मातोश्री’वर जाऊन नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केली होती.
संबंधित बातम्या:
तुकाराम मुंढेंच्या उचलबांगडीसाठी मुख्यमंत्र्याशी चर्चेला तयार: उद्धव ठाकरे
नवी मुंबईचे महापौर ‘मातोश्री’वर
नवी मुंबईचे महापौर राजीनामा देणार?
‘तुकाराम मुंढेंचा स्वभाव अहंकारी’
‘डॉन’ तुकाराम मुंंढेंसाठी ईरेला पेटू नका, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
आयुक्त तुकाराम मुंढेंची तात्काळ बदली होणार नाही: सूत्र
नवी मुंबई मनपा आयुक्त तुकाराम मुंढे मंत्रालयात
रिझल्ट देणं माझं काम : तुकाराम मुंढे