नवी मुंबईतील खारघरमधल्या रिक्षाचालकांचा बंद अखेर मागे
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 28 Nov 2017 08:03 PM (IST)
सकाळी पोलिस उपायुक्त, पनवेल आरटीओ आणि खारघर रिक्षा युनियन, तळोजा रिक्षा युनियनची बैठक होणार आहे
नवी मुंबई : खारघरवासियांना अखेर रिक्षाचालकांनी दिलासा दिला आहे. गेल्या 8 दिवसांपासून बंद असलेल्या रिक्षा उद्या सकाळी 11 वाजता सुरु होणार आहेत. खारघर-तळोज्यातील रिक्षा चालकांनी आपला संप मागे घेतला आहे. उद्या सकाळी पोलिस उपायुक्त, पनवेल आरटीओ आणि खारघर रिक्षा युनियन, तळोजा रिक्षा युनियनची बैठक होणार आहे. या बैठकीत कुठल्या परिसरातील प्रवासी कुणी न्यायचे यावर तोडगा निघणार आहे.