कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांच्या विकासासाठी नाशिक पॅटर्न राबवण्याचा मानस केडीएमसीचे नवनियुक्त स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी व्यक्त केला आहे.
केडीएमसीच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक आज (मंगळवार) पार पडली. यावेळी भाजपचे डोंबिवलीतील नगरसेवक राहुल दामले यांची बिनविरोध निवड झाली. तर महिला-बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या दीपाली पाटील यांची निवड झाली.
‘कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे निधीची मोठी कमतरता असून त्यामुळे शहराचा विकास अर्धवट राहिला आहे. मात्र यावर मात करण्यासाठी नाशिकप्रमाणे खासगी कंपन्यांचा सीएसआर फंड कसा वापरता येईल? याकडे लक्ष देणार असून त्यासाठी शहरातील नामांकित अर्थतज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं जाईलं.’ असं राहुल दामले यावेळी म्हणाले.
‘शिवाय ही कामं प्रशासनाची असली तरी, प्रशासन उदासीन असल्यानं आम्ही ते काम करु’, असं म्हणत त्यांनी प्रशासनालाही टोला लगावला.
‘कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी नाशिक पॅटर्न राबवणार’
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jan 2018 06:49 PM (IST)
कल्याण-डोंबिवली शहरांच्या विकासासाठी नाशिक पॅटर्न राबवण्याचा मानस केडीएमसीचे नवनियुक्त स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी व्यक्त केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -