मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या एकदिवसाच्या मुंबई दौऱ्यासाठी येत आहेत. या दौऱ्यात ते सीएसटीएम स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमास मुंबई तसेच इतर भागातून बरीच गर्दी होण्याची शक्यता आहे. पूर्व द्रुतगती मार्ग, पी.डीमेलो रोड, शहीद भगतसिंग रोड तसेच कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुपारी 2.45 ते 4.15 पर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मरोळमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमांच्या ठिकाणी गर्दी होणार आहे. त्यामुळं पूर्व द्रुतगती मार्ग, पी. डिमेलो रोड, शहीद भगतसिंग रोड आणि कार्यक्रमस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुपारी पावणेतीन ते सव्वा चार वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. ईस्टर्न फ्रीवे मार्गावरची वाहतूक बंद करून, ती डी एन रोड आणि जे जे ब्रिजवर वळवण्यात आली आहे. त्यामुळं वाशीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाण्यासाठी वाहनांनी ईस्टर्न फ्री वे मार्गाचा वापर न करता पूर्व द्रुतगती मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कुलाब्यातल्या बधवर पार्क, कफ परेड आणि नेव्ही नगरची वाहतूक मंत्रालयाकडून वळवण्यात आली आहे.
असा आहे वाहतुकीतील बदल
इस्टर्न एक्सप्रेस
पूर्व द्रुतगती मार्ग, पी.डीमेलो रोड, शहीद भगतसिंग रोड तसेच कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुपारी 2.45 ते 4.15 पर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. इस्टर्न फ्री वे मार्गावरची वाहतूक बंद करून डी एन रोड आणि जे जे ब्रिजने वाहतूक वळवली आहे. वाशीहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहनांनी इस्टर्न फ्री वे मार्गाचा वापर न करता पूर्व द्रुतगती मार्गाचा वापर करावा. बधवर पार्क, कफ परेड, नेव्ही नगरची वाहतूक ही मंत्रालयाकडून वळवण्यात आली आहे.
वेस्टर्न एक्सप्रेस
अंधेरी, घाटकोपर-कुर्ला रोड या दोन्ही वाहिन्यांवरील मरोळ नाक्याच्या दिशेने येणारी वाहने साकीनाका जंक्शन येथून साकी विहार रोडने मिलिंद नगर एल. अॅन्ड टी. गेट नं. 8 येथून डावे वळण घेउन जे. व्हि. एल. आर. रोडने पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे मार्गस्थ होतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यासाठी मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरामध्ये बोरी मुस्लिम समाजाकडून उभारण्यात आलेली अल जामिया युनिव्हर्सिटीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून जवळपास 1000 पोलिसांचा ताफा तैनात करण्यात येणार आहे. यात मुंबई पोलिसांचे पाच डीसीपी, 200 अधिकारी, 800 अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत.