मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात चौथ्यांदा केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मागील दीड महिन्यांपासून सुरु असलेली निवडणुकीची रणधुमाळी संपवून थकवा दूर करण्यासाठी आणि देवदर्शनासाठी मोदी केदारनाथला गेले होते. मोदींच्या या केदारनाथ दर्शनावर विरोधकांचं टीका करणे सुरुच आहे. त्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीदेखील भर पडली आहे. शरद पवार यांनी मोदींच्या केदारनाथ दर्शनाला 'नौटंकी' असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीदरम्यान पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवारांनी मोदींना लक्ष्य केले.
शरद पवार यावेळी म्हणाले की, "सध्या राजकारणात नौटंकी सुरु आहे. काल संध्याकाळपासून वृत्तवाहिन्यांवरही नौटंकीच चालू होती. मोदींचं केदारनाथला जाणं हीदेखील नौटंकी आहे."
काल देशभरातील सर्व वृत्तवाहिन्यांनी मांडलेल्या एक्झिट पोलबाबत बोलताना पवार म्हणाले की, "इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मागे एक मोठी ताकद उभी आहे. त्यामुळे ते वेगळी लाईन मांडत आहेत. परंतु येत्या दोन दिवसांत सत्य समोर येईल. लोकांच्या चिंता दूर होतील."
शरद पवार म्हणाले की, "मोदींच्या केदारनाथ यात्रेबाबत पवार म्हणाले की, निवडणूक होतात, कोणी जिंकतं तर कोणी हरतं, परंतु ज्याच्यावर देशाची जबाबदारी आहे, ती व्यक्ती हिमालयात जाऊन बसली आहे. अशा प्रकारचं चित्र मी पहिल्यांदाच पाहत आहे."
एक्झिट पोल आणि मोदींचं केदारनाथ मंदिरात जाणं ही नौटंकी : शरद पवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 May 2019 11:05 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात चौथ्यांदा केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मागील दीड महिन्यांपासून सुरु असलेली निवडणुकीची रणधुमाळी संपवून थकवा दूर करण्यासाठी आणि देवदर्शनासाठी मोदी केदारनाथला गेले होते. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार यांनी मोदींवर टीका केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -