मुंबई : खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाला येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी 'बादली' चिन्ह मिळाले आहे. या संदर्भात आज सायंकाळी 5 वाजता बांद्रा पश्चिम येथील रंगशारदा येथे होणाऱ्या 'मुंबईकर कोकणवासीयांच्या मेळाव्यात' राणे घोषणा करणार आहेत.
नारायण राणे अधिक माहिती देताना म्हणाले की, आमचा पक्ष येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शक्ती लावून लढणार आहे. त्याची तयारी जोरात सुरु झालेली आहे. आज आम्हाला निवडणूक लढण्यासाठी हक्काचे निवडणूक चिन्ह मिळालेले आहे, याची अधिकृत घोषणा आम्ही आज करणार आहोत.
कोकणवासीयांच्या मेळाव्याला मुंबईतील सर्व कोकणी माणसे उपस्थित राहणार आहेत.
मुंबईकर कोकणवासीय मेळाव्याला नारायण राणे यांच्यासह माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे आणि सिंधुदुर्ग जिल्हातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
'बादली' घेऊन नारायण राणेंचा 'स्वाभिमान' निवडणुकीच्या रणांगणात उतरणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Mar 2019 07:47 AM (IST)
आमचा पक्ष येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शक्ती लावून लढणार आहे. त्याची तयारी जोरात सुरु झालेली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -