मुंबई : एकीकडे नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबद्दल जोरदार चर्चा सुरु असताना दुसरीकडे राणेंनी खास आपल्या शैलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत शिवसेनेला डिवचलं आहे. फडणवीस सरकारला आज तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राणेंनी मुख्यमंत्र्यांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या. पण या शुभेच्छा देताना त्यांनी थेट शिवसेनेवरच निशाणा साधला.


राणेंनी नेमक्या काय शुभेच्छा दिल्या?

 


नारायण राणेंच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन फोटो अपलोड करुन मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी आज राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची तारीखही जाहीर करुन टाकली. 11 डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळात राणेंचा समावेश होईल, अशी माहिती पाटलांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

दरम्यान, राणेंना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शिवसेनेला गंभीर विचार करायला लागेल अशी भूमिका घेत शिवसेनेनं भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, शिवसेनेच्या विरोध न जुमानता भाजपनं राणेंना मंत्रिमंडळात घेण्याचा विचार पक्का केल्याचं खात्रीलायक वृत्त समजतं आहे.

संंबंधित बातम्या :

राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश ठरला, खडसेंचं बघू : चंद्रकांत पाटील


भाजपला सत्तेत आणणारे बाहेर, अन् राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत : खडसे


राणेंना होणारा शिवसेनेचा विरोध निरर्थक : मुख्यमंत्री


ईडीनं आरोपपत्र दाखल केलेले राणे मंत्रिमंडळात का? : शिवसेना


नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशात शिवसेनेचा खोडा?