Narayan Rane On Uddhav Thackeray: उगवत नाही, फुलत नाही, वास येत नाही असा चाफा मातोश्रीवर आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. मी इथे आलो आणि मला सत्कारच्या वेळी पुस्तक दिलं. मला पुरुषार्थ हे पुस्तक दिलं. हे पुस्तक मला नाही उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दिलं पाहिजे, अशी टीका देखील नारायण राणे यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. अडीच वर्ष काय त्यांनी केलं? असा सवाल करत राणे म्हणाले की, आता रोज फक्त शिंदे आणि फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. मी सांगेन की उत्तर देऊ नका, आपला वेळ वाया घालवू नका, कामं करा असा सल्ला देखील राणे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला. बाळासाहेब हे साहेब होते. साहेबांच्या नखाची सर देखील यांना नाही. कशाची सर देऊ यांना, कोळसाही म्हणू शकत नाही, असंही राणे म्हणाले.
मोदी जेव्हा बोलत असतात तेव्हा वाटतं बघतच बसावं- नारायण राणे
नारायण राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा 17 सप्टेंबरला वाढदिवस झाला. भारतीय जनता पक्षाने त्यांचा वाढदिवस एक दिवस नाही तर 15 दिवस विविध माध्यमातून साजरा केला. पंतप्रधान मोदींचं जागतिक कीर्तिचं व्यक्तिमत्व आहे. जगात त्यांचं कौतुक केलं जातं. कॅबिनेटला जेव्हा मी बसतो तेव्हा सर्व गोष्टी त्यांना माहित असतात. ते जेव्हा बोलत असतात तेव्हा वाटतं बघतच बसावं. मोदींना सर्व वर्गाची काळजी आहे.
राणे यावेळी म्हणाले की, मला एक वर्ष मंत्री होऊन झाले. मी सव्वा लाख उद्योजक तयार केले. महाराष्ट्रात मी 60 टक्के ठिकाणी जाऊन आलोय, असंही ते म्हणाले.
नारायण राणे यांच्यासह त्यांचे दोन्ही पुत्र नेहमीच ठाकरे परिवारावर निशाणा साधताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. बापाचं धोरण न पाळू शकणाऱ्या मुलाची दशा पाहून आम्ही बाहेर पडलो, याला चोरी केली असं म्हणत नाहीत. "बाळासाहेब आयुष्यभर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत लढले, यांनी मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे विचार मातीत घातले. देशाच्या मोठ्या नेत्यांना गिधाडं म्हणाले, हा लबाड लांडगा आहे. उद्धव ठाकरे यांच्याएवढा खोटारडा माणूस मी आयुष्यात कधीही पाहिला नाही. युतीमध्ये असताना मला मंत्रीपद मिळू नये म्हणून उद्धव ठाकरे अमित शाह यांना फोन करत होते, असा आरोपही राणेंनी केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
Narayan Rane : 'अधीश'वर हातोडा पडणारच; सुप्रीम कोर्टाने राणेंची याचिका फेटाळली
Uddhav Thackeray vs Narayan Rane: ठाकरे चिवचिव करतात, उद्धव ठाकरेंच्या भाषणावर नारायण राणेंचा पलटवार