मुंबई : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ऑगस्ट क्रांती मैदानात आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी पटोले यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. तुम्हाला देश विकायला सत्ता दिली नाही, 26 जानेवारीला शेतकऱ्यांना यातना दिल्या आणि राज्यसभेत रडता, अशी टीका नाना पटोले यांनी मोदी सरकारवर केली आहे.


मोदी सरकार शेतकऱ्यांबद्दल बोलत नाही, कारण, यांना शेतकऱ्यांची काळजी नाही. सत्तेवर आल्यावर मोदी सरकारने विश्वासघात केल्याचा घणाघाती आरोप पटोले यांनी केला. सध्या मोदी सरकारने देश विकायला काढला आहे. मात्र, महाराष्ट्रातील एकही प्रॉपर्टी केंद्राला विकून देणार नाही. याविरोधात काँग्रेस आंदोलन करेल, असेही ते म्हणाले.




महाराष्ट्रात काँग्रेस एक क्रमांकाचा पक्ष असेल : पटोले
महाराष्ट्रात काँग्रेस एक क्रमांकाचा पक्ष असेल हा शब्द सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना दिला आहे. काँग्रेसचे सरकार बनवायला लोक गोळा झाले आहेत. काँग्रेसच्या माध्यमातूनचं देशात परीवर्तन होणार आहे. नरेंद मोदी शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणत असतील तर त्यांना 'ढोंगीजिवी' नाव द्यायचं असा पवटवारही पटोले यांनी केला.


लोकांची फसवणूक करुन मोदी सरकार सत्तेत..
केंद्रातील मोदी सरकार संविधान पायदळी तुडवून काम करत आहे. जनतेपेक्षा मोजक्या उद्योगपतींसाठी हे सरकार काम करत आहे. त्यामुळे मोदी सरकार चले जावं हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. लोकशाहीत असा ठराव आणायची वेळ आली आहे. खोटी आश्वासन देऊन मोदी सरकार आलं आहे. नोकरी देऊ, काळे धन आणू, जुमले देऊन लोकांना फसवलं. शेतकऱ्यांचाही या सरकारने सत्तेत आल्यावर विश्वासघात केलाय.


Nana Patole | काँग्रेस पक्षाच्या प्रदेक्षाध्यपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नाना पटोले अॅक्शन मोडमध्ये