नालासोपारा : घरातील किरकोळ वादातून सुनेने सासूची निर्घृणपणे हत्या केली. नालासोपारा पूर्व अवघनगर पडखळकळ पाडा आचोले डोंगरी इथे काल (10 ऑगस्ट) संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही घटना घडली.
गौरी चांदरशेखर वर्मा (वय 45 वर्ष) असं हत्या झालेल्या सासूचं नाव आहे तर प्रीती नंदन वर्मा (वय 23 वर्ष) असं हत्या करणाऱ्या सुनेचं नाव आहे.
सासू-सुनेचा घरातील किरकोळ कारणावरुन वाद झाला. याच वादातून सुनेने धारदार शस्त्राने वार करुन सासूची हत्या केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी तुलिंज पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करुन, सुनेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
नालासोपाऱ्यात किरकोळ वादातून सुनेकडून सासूची निर्घृण हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Aug 2018 02:15 PM (IST)
गौरी चांदरशेखर वर्मा (वय 45 वर्ष) असं हत्या झालेल्या सासूचं नाव आहे तर प्रीती नंदन वर्मा (वय 23 वर्ष) असं हत्या करणाऱ्या सुनेचं नाव आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -