नालासोपारा : गुजरात गॅस कंपनीच्या निष्काळजीपणामुळे एकजण गंभीररित्या जखमी झालाय. घरात कनेक्शन देताना गॅस लिकेज झाला. त्यानंतर घरात गॅसचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात घरातील एक जण गंभीर जखमी झाला असून, गॅस कनेक्शन देणारे कामगार अक्षरश: तेथून पळून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. नालासोपारा पूर्व गाला नगर बी एम सी कॉलनी सी 10 नंबर च्या दुसऱ्या मजल्यावरील घरात सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली आहे.
सकाळ पासून प्रत्येक घरात गॅस कनेक्शन देण्याचे काम चालू होते
संजय रघुनाथ निकम असे गॅस पाईपलाईन स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून, जखमी व्यक्ती हा आपल्या मुलीकडे आला असताना ही घटना घडली आहे. वसई विरार नालासोपाऱ्यात गुजरात गॅस पाईप लाईनचे सोसायटी मधील घरात गॅस कनेक्शन देण्याचे काम चालू आहे. नालासोपारा पूर्व गाला नगर बी एम सी कॉलनी सी 10 नंबर च्या इमारतीत आज सकाळ पासून प्रत्येक घरात गॅस कनेक्शन देण्याचे काम चालू होते.
गॅस लाईनचे कॉक बंद न करताच घरात गॅस कनेक्शन देण्याचे काम
गुजरात गॅस कंपनीच्या कामगारांनी मुख्य गॅस लाईनचे कॉक बंद न करताच घरात गॅस कनेक्शन देण्याचे काम करीत असताना आज सायंकाळी सहाच्या सुमारास गॅस लिकेज होऊन प्रथम स्पार्क झाला. त्यानंतर त्याचा स्फोट होईन घरातील एक जण यात गंभीर रित्या भाजला आहे. जखमी हे आपल्या मुलीकडे आले होते. मुलीच्या घरात गॅस कनेक्शनचे काम सुरू असल्यामुळे ते कामगारांच्या बाजूला उभे होते.
अचानक गॅस गळती मुळे स्फोट होताच काम करणारे कामगार तेथून पळून गेले. तेव्हा जखमीला काहीच कळाले नसल्याने ते त्याच ठिकाणी थांबले. स्फोटात आगीचा भडका त्यांच्या अंगावर येऊन ते गंभीर रित्या भाजले आहेत. जखमीच्या नातेवाईकाने गुजरात गॅस कंपनीच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप केला असून त्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
VIDEO : चिमुकल्याच्या छातीवर बसली, गळा दाबला, डोकं जमिनीवर आपटलं; हैवान आईकडून मुलाला बेदम मारहाण, अंगाचा थरकाप व्हिडीओ व्हायरल