मुंबई: नालासोपारा शस्त्रसाठ्यानंतर एटीएसनं एक धक्कादायक खुलासा केला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव, मुक्ता दाभोळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रितू राज यांची नावं हिटलिस्टवर होती, असा दावा एटीएसने न्यायालायात केला.


नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एटीएसनं मुंबई सत्र न्यायालयात हा गौप्यस्फोट केला.

आज अविनाश पवार या आरोपीला न्यायालयात हजर केलं. त्याच्या कोठडीत वाढ करावी अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने यापूर्वीच्या तपासात काय काय चौकशी केली, काय माहिती मिळाली, ते सांगा त्यानंतर कोठडी वाढवण्याची मागणी करा, असं बजावलं.

त्यावेळी एटीएसने जितेंद्र आव्हाड, श्याम मानव, मुक्ता दाभोळकर आणि रितू राज यांची नावं पकडण्यात आलेल्या आरोपींच्या हिटलिस्टवर होती. त्यांना मारण्याचा किंवा त्यांना लक्ष्य करण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती एटीएसने कोर्टात दिली.

कोण आहे अविनाश पवार?

नालासोपाऱ्यातील स्फोटकांप्रकरणी मुंबईतील माझगाव डॉकमधून अविनाश पवार नावाच्या व्यक्तीला दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी (24 ऑगस्ट) रात्री बेड्या ठोकल्या.

स्फोटक प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. याआधी वैभव राऊत (9 ऑगस्ट), शरद कळसकर (10 ऑगस्ट), सुधन्वा गोंधळेकर (10 ऑगस्ट) आणि श्रीकांत पांगारकर (18 ऑगस्ट) यांना अटक करण्यात आली होती. या चौघांच्या चौकशीत अविनाश पवारचं नाव आल्यानंतर एटीएसने त्याला बेड्या ठोकल्या.

संबंधित बातम्या

नालासोपारा स्फोटकांप्रकरणी पाचवी अटक, मुंबईतून एकाला बेड्या 

अमोल काळे, वीरेंद्र तावडे हेच दाभोलकरांच्या हत्येचे मास्टरमाईंड : सीबीआय  

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : सीबीआयच्या पहिल्या आरोपपत्रावरुन नवा वाद 

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : दिवसभरात औरंगाबादमध्ये काय-काय घडलं?  

दाभोलकर हत्या : अंदुरेच्या नातेवाईक-मित्राच्या घरातून शस्त्रसाठा जप्त 

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीच्या डायरीत आणखी सहा नावं : सूत्र  

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपी सचिन अंदुरेला 7 दिवसांची पोलिस कोठडी