नालासोपारा : क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून 21 वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला आहे. डान्स करताना अश्लील हावभाव केल्यावरुन झालेल्या भांडणानंतर मुंबईजवळील नालासोपाऱ्यात तरुणाची हत्या करण्यात आली.
नालासोपारा पूर्वमधील मोरेगांव बजरंग नगर परिसरात डीजेच्या तालावर काही जण नाचत होते. डान्स करताना अश्लील हावभाव केल्यावरुन 21 वर्षीय विनय डिचवलकरशी काही तरुणांचा वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की टोळक्याने विनयची हत्या केली.
रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. नालासोपाऱ्यातील तुलींज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
डीजेवर नाचताना अश्लील हावभाव, नालासोपाऱ्यात तरुणाची हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jul 2017 03:59 PM (IST)
क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून 21 वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला आहे. डान्स करताना अश्लील हावभाव केल्यावरुन झालेल्या भांडणानंतर मुंबईजवळील नालासोपाऱ्यात तरुणाची हत्या करण्यात आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -