भिवंडी : आंघोळीसाठी गरम पाणी न दिल्याच्या रागातून भिवंडीत पतीनं पत्नीची हत्या केली आहे. पत्नीच्या डोक्यात हातोड्यानं वार करत तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी दोन दिवसांनी आरोपी पतीला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे.
भिवंडीमध्ये दोन दिवसांपूर्वी गरम पाणी न दिल्याच्या रागातून आयूब खानं नावाच्या व्यक्तीनं पत्नीची हत्या केली होती. हत्येनंतर आरोपी पती फरार झाला होता. ज्यावेळी आयूब खाननं पत्नी नसरीनबानोची हत्या केली, त्यावेळी तो दारुच्या नशेत असल्याचं स्पष्ट झालं आहे. आयूबच्या जाचाला कंटाळून त्याची दोन मुलं मावशीकडे राहतात.
आयूब खानला पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली शांतीनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. आरोपीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.