मुलुंडमधील आर मॉलला आग, अग्निशमनच्या 4 गाड्या घटनास्थळी
एबीपी माझा वेब टीम | 11 Apr 2017 08:10 PM (IST)
मुंबई: मुंबईतील मुलुंडमधील आर मॉलमध्ये आग लागल्याची प्राथमिक वृत्त समजतं आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगी नेमकी किती मोठी आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, आता ही आग अटोक्यात आली असल्याचं समजतं आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आग लागल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण मॉल सध्या खाली करण्यात आला आहे. तसेच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.