मुंबईच्या सीएसटी स्टेशनमध्ये महिला अधिकाऱ्यांची हाणामारी
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 12 Apr 2017 07:31 AM (IST)
मुंबई : मुंबईतील सीएसटी रेल्वे स्थानकात महिला अधिकाऱ्यांची फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. काल दुपारी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या रेल्वे मुख्यालयात एका अधिकारी महिलेनं दुसऱ्या अधिकारी महिलेला बेदम मारहाण केली. मारहाण झालेली महिला रेल्वेच्या तक्रार निवारण समितीची वकिल आहे. डेलिला फर्नांडीस असं या मारहाण झालेल्या महिलेचं नाव आहे. तर मारहाण करणाऱ्या महिलेचं नाव स्वाती सिन्हा असल्याचं स्पष्ट झालं आहे. स्वाती सिन्हा मध्य रेल्वेत उच्च पदावर कार्यरत आहे. दरम्यान ही मारहाण सुरु असताना ड्युटीवरील कॉन्स्टेबलनं महिला कॉन्स्टेबलला बोलावून झटापट सोडवली आहे. याप्रकरणी माता रमाबाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. व्हिडीओ :