मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक क्रिशनेनंदू चौधरी यांच्या हत्येचा उलघडा झाला आहे. पैशाच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचं तपासात उघड झालं आहे. व्यावसायिक मित्रानेच हत्या करून आपल्यावर शंका येऊ नये म्हणून मालाड मालवणी पोलीस ठाण्यात क्रिशनेनंदू बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी 24 तासातच आरोपीला गजाआड केलं.
फुरकन शेख असं अटक केलेल्या आरोपींच नाव असून तो एक इवेन्ट कंपनी चालवत होता. पैशाच्या वादातून त्याने क्रिशनेनंदू यांची हत्या केली. क्रिशनेनंदू सिनेमा, मालिका, व्हीआयपी लग्न सोहळे यांच्या सेटचे डिझाईन बनवत असे. क्रिशनेनंदू डिझाईन बनवून आरोपी फुरकनला देत होता. या व्यवहारात क्रिशनेनंदूचे फुरकनकडे 85 हजार देणं बाकी होतं. त्यासाठी क्रिशनेनंदू याने फुरकनकडे पैशाचा तगादा लावला होता.
मात्र सध्या पैसे नसल्याच फुकरन सांगत होता. याच पैशाच्या वादातून मालाडच्या आर्यलॅंड दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर फुकरनने दोन साथिदारांच्या मदतीने क्रिशनेनंदूवर धार धार हत्याराने वार करुन हत्या केली. त्यानंतर क्रिशनेनंदू यांचा मृतदेह मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरारच्या खानिवडे ब्रिजवरून खाडीत फेकला. दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह खाडीकिनारा आढळल्यानंतर पोलिसांची तपासाची चक्रे फिरवली.
शंका येवू नये म्हणून दुसऱ्याच दिवशी आरोपी फुकरनने मालाड मालवणी येथे क्रिशनेनंदू बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मात्र पोलिसांच्या तपासात फुकरनचं आरोपी असल्याचं निष्पन्न झालं. याप्रकरणी आणखी दोन साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.