बाबासाहेबांच्या स्मारकाची आठवण करुन देण्यासाठी 'आठवण मोर्चा'
एबीपी माझा वेब टीम | 29 Nov 2017 08:47 AM (IST)
इंदू मिलच्या जागेवर प्रस्तावित असलेल्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम लवकर सुरु करण्याची मागणी यावेळी भिमसैनिकांनी केली.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या रखडलेल्या कामाची आठवण करुन देण्यासाठी सामाजिक समता मंचाकडून चैत्यभूमी ते इंदू मिलपर्यंत मंगळवारी (28 नोव्हेंबर) 'आठवण मोर्चा' काढण्यात आला. इंदू मिलच्या जागेवर प्रस्तावित असलेल्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम लवकर सुरु करण्याची मागणी यावेळी भिमसैनिकांनी केली. स्मारकासाठी जागा घोषित होऊन दोन वर्षे लोटली, भूमिपूजनही झालं. पंतप्रधानांनी पुढाकार घेतला. मात्र स्मारकाच्या कामाचा पत्ता नाही, असं सामाजिक समता मंचाचे अध्यक्ष विजय कांबळे म्हणाले. भाजप सरकार स्मारकाचं काम मार्गी लावेल म्हणून भाजपच्या बाजूने उभं राहिलो. स्मारक कसं असावं याबाबत आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही, असा आरोपही विजय कांबळे यांनी केला. पाहा व्हिडीओ