VIDEO : लोकलपुढे महिलेची उडी, पोकळीत पडल्याने जीव वाचला
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 04 Jul 2017 02:42 PM (IST)
मुंबई : मुंबईत मध्य रेल्वेवरील घाटकोपर स्थानकावर आत्महत्येचा प्रयत्न करणारी सुदैवाने महिला बचावली आहे. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, या म्हणीचा प्रत्यय या महिलेचं उदाहरण पाहून येतो. ही घटना स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना 26 जून रोजी घडली असून त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. घाटकोपर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर कल्याणच्या दिशेने जाणारी ट्रेन स्थानकात आली. त्यावेळी महिलेने ट्रेनसमोर उडी मारली, मात्र सुदैवाने ती ट्रेनखाली दोन रुळांच्या मधील पोकळीत पडली. या घटनेत महिलेला किंचितशीही जखम झाली नसल्याची माहिती आहे. काहीच दुखापत झाली नसल्याचं लक्षात आल्याने महिला ट्रेनखालून दुसऱ्या बाजूने निघून गेली. संबंधित महिला कोण आहे, आत्महत्येच्या प्रयत्नाचं कारण याबाबत कुठलीही माहिती नाही. या संपूर्ण प्रकरणाबाबत जीआरपीएफकडे कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. पाहा व्हिडिओ :