मुंबईत इमारतीवरुन उडी मारुन नवविवाहितेची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 16 Mar 2018 01:47 PM (IST)
ही तरुणी नवविवाहिता होती. तिचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. छाया भूतिया असं तिचं नाव आहे.
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : मुंबईत एका तरुणीने इमारतीच्या तेराव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. ताडदेव परिसरात आज ही घटना घडली. ही तरुणी नवविवाहिता होती. तिचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. छाया भूतिया असं तिचं नाव आहे. तरुणीने आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.