Mumbai Weather Today Warning: मुंबईतील तापमानातील बदलांमुळे लोकांच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. अनेकांना सर्दी, खोकला, अंग दुखीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हिवाळ्यात मुंबईत सलग तीन दिवस कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या वर बघायला मिळत आहे. उकाड्यामुळे मुंबईकर हैैराण झाले आहेत. 


मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये अशीच गर्दी बघायला मिळते आहे. कारण आहे ऐन हिवाळ्यात गायब झालेली थंडी. थंडीच्या महिन्यातही मुंबईचा पारा ३६ अंशांपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे अनेकांचे स्वेटर्स आणि शॉल अजूनही धूळखात तर पडल्याच आहेत. मात्र, सोबतच सर्दी, खोकला आणि अंगदुखीसारख्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता काही दिवसांपूर्वी ३०० पार बघायला मिळाली होती. अशात अनेकांना सर्दी, खोकल्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. मात्र, हिवाळ्यातही तापमान ३५अंशापार असल्यानं तीच परिस्थिती बघायला मिळते आहे. 
 
मुंबईतील पारा मागील तीन दिवसांपासून ३५ अंश सेल्सिअस पार बघायला मिळतोय. मुंबईत अजूनही म्हणावी  तशी थंडी जाणवत नाही आहे. १६ आणि १७ डिसेंबर रोजी मुंबईतील कमाल तापमान देशात सर्वाधिक बघायला मिळाले. त्यामुळे उन्हाळा सुरु आहे की हिवाळा हेच समजायला मार्ग नाही.  हिवाळ्यात तापमान 35 अंशांपर्यंत तापमान जात असल्याने अनेकांना सर्दी, ताप, खोकला, शरीर दुखणे यांसारख्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं बघायला मिळतंय. याचा परिणाम लहान मुलांच्याही आरोग्यावर होतोय.


मुंबईतून हुडहुडी गायब! 
मुंबईत १६ डिसेंबर रोजी कमाल तापमान ३५.६ अंश नोंदवले गेले. १७ डिसेंबर रोजी तेच वाढून ३५.९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. काल देखील मुंबईतील तापमान ३५.२ अंशांपर्यंत तापमान गेलं.  सोबतच किमान तापमानात  वाढ झालेली दिसते आहे. मागील ३ दिवसात किमान तापमान  २३ अंश सेल्सिअस आहे. 
 
यंदा मुंबई शहरात डिसेंबर महिन्यात सामान्य तापमानापेक्षा २-३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. डिसेंबरमध्ये शहरातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान १९८७ मध्ये ३८ अंश सेल्सियस नोंदवले गेले होते. मात्र, येत्या २-३ दिवसातपुन्हा एकदा तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ख्रिसमसमध्ये पुन्हा एकदा थंडीचा अनुभव घेता येऊ शकेल. 






आणखी वाचा : Mumbai Weather News : मुंबईत आज 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद; लहान मुलांसह नागरिकांना सर्दी, खोकल्याचा त्रास