Mumbai News मुंबई वॉटर टँकर असोसिएशन (Mumbai Water Tanker Association  संप पुकारल्यानंतर मुंबईतील (Mumbai) अनेक भागांना फटका बसत आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,पाणीपुरवठा मंत्री यांची भेट मिळावी यासाठी वॉटर टँकर सोसिएशनची चर्चा सुरु आहे. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा संपामुळे मुंबईतील हॉटेल्स (Hotels), मॉल्स (Malls) आणि काही रुग्णालयांना (Hospitals) त्यासोबतच मुंबईतील विकासकामांना फटका बसत आहे. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने मुंबईत सेंट्रल ग्राउंड वॉटर अथोरिटीच्या गाईडलाइन्स आणि नियमांची अंमलबजावणी मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) केली जात असल्याने हा संप पुकारला आहे.  


मुंबईत सेंट्रल ग्राउंड वॉटर अथोरिटीच्या या नियमांची अंमलबजावणी ही फक्त मुंबईत केली जात असल्याने या विरोधात 8 फेब्रुवारी मध्यरात्रीपासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशने संप पुकारला आहे. मुंबईमध्ये अडीच हजार टँकर्स आहेत. जे विविध ठिकाणी पाणीपुरवठा करतात आणि मुंबई महापालिकेला देखील मदत करतात. अनेक ठिकाणी सोसायटी सुद्धा या वॉटर टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत त्यामुळे तिथे सुद्धा मोठ्या अडचणींना या संपामुळे सामना करावा लागत आहे


काय आहेत नवे नियम?



  • वॉटर टँकर पुरवणाऱ्या मालकाकडे मुंबईत दोन हजार स्क्वेअर फिटची जागा हवी

  • या जागेमध्ये टँकर पाण्याने भरले जावे, रस्त्यावर कुठेही टँकर पाण्याने भरु नये

  • पाच ते पंधरा वॉटर टँकरसाठी रोज प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार शिवाय लॉक शीट तयार करावे लागणार

  • टेलिस्कोपिक मीटरचा वापर प्रत्येक ठिकाणी करावा लागणार

  • प्रशासनाला वॉटर टँकर सुरु ठेवण्यासाठी दरवर्षी अॅडव्हान्स द्यावा लागणार शिवाय एनओसी काढावी लागणार

  • याच नव्या नियमांच्या अंमलबजावणीला वॉटर टँकर असोसिएशनचा विरोध आहे