मुंबई : मुंबईत हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स संदर्भात आज रात्री उशिरापर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. हॉटेलला रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  मॉलमधील रेस्टॉरंट आणि थिएटर्स मात्र बंद राहणार असल्याची माहिती आहे. तसेच  ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत त्यांना मॉलमध्ये प्रवेश राहणार असल्याचं देखील कळतंय. सध्या रेल्वे पास साठी जो क्यू आर कोड वापरला जातोय तोच मॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि इतर ठिकाणी वापरला जाण्याची शक्यता देखील आहे. 


कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांसाठी युनिव्हर्सल पास! रेल्वे, मेट्रो, मोनो, बस आणि मॅालसाठीही उपयोगी ठरणार


दरम्यान यासंदर्भात मंत्री अस्लम शेख यांनी बोलताना म्हटलं आहे की, मुंबईत अनेक निर्बन्ध आणले होते ते शिथिल केले आहेत.   4 वाजेपर्यंत रेस्टॉरंटची वेळ दिली आहे.  10 वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात यावा अशी  ही मागणी केली आहे. आजच्या कॅबिनेटमध्येही यावर चर्चा होऊ शकते.  आणि येत्या दोन दिवसांत यावर निर्णय होईल.  मॉलचाही प्रश्न आहे त्यात अनेक दुकान असतात, असं शेख म्हणाले.


लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मुंबई लोकल रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा


प्रवाशांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत, त्यांना मुंबई लोकल रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी सातत्याने मागणी होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय जाहीर केला. लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली होती. त्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात आली आहे.


Mumbai Local Pass : आजपासून ऑफलाईन लोकल रेल्वे पास वितरणाला सुरुवात, असा मिळणार पास


लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेन प्रवासासाठी विशिष्ट पास देण्यात येणार आहेत. या पासवर क्यूआर कोड असणार आहे. हा पास ‘युनिव्हर्सल पास’ म्हणून ओळखला जाईल. हा पास लोकल ट्रेनसोबतच मेट्रो, मोनोरेल त्याचप्रमाणे मॉल किंवा इतर ठिकाणी सुद्धा चालू शकणार आहे.


कसा मिळवता येणार पास?



  • राज्य सरकारकडून एक वेबसाईट तयार करण्यात येणार आहे. ही वेबसाईट को-विनशी लिंक केली जाणार आहे. यामुळे व्यक्तीचे लसीकरण पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासता येणार आहे. 

  • ज्या व्यक्तीला पास काढायचा आहे, त्याने या वेबसाईटवर आपला मोबाईल क्रमांक एंटर करुन, मोबाईलवर आलेला ओटीपी वेबसाईटवर समाविष्ट करायचा आहे. 

  • त्यानंतर व्यक्तीला आपले लसीकरण प्रमाणपत्र वेबसाईटवर अपलोड करायचे आहे. 

  • तसेच आपला एक फोटो वेबसाईटवर अपलोड करायचा आहे. 

  • व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्यूआर कोड पास (युनिव्हर्सल पास) जनरेट होईल. 

  • हा पास रेल्वेच्या तिकीट खिडकीवर दाखवून, तिकीट किंवा पास मिळवता येणार आहे. 

  • ज्या नागरिकांकडे इंटरनेटची सेवा उपलब्ध नाही किंवा ज्यांना वेबसाइट हाताळता येत नाही, अशा नागरिकांसाठी मुंबई महापालिकेत हेल्प डेस्क सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याठिकाणी नागरिक आपली कागदपत्रे दाखवून युनिव्हर्सल पास मिळवू शकतात.