मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या कायदे विषयाच्या अर्थात लॉ च्या परीक्षेला 130 दिवस म्हणजेच चार महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. मात्र अजूनही 10 हजारांपेक्षा जास्त उत्तरपत्रिका तपासणे बाकी आहे.

मात्र उन्हाळी परीक्षा जवळ आल्या आहेत, त्यामुळे हाच निकाल लागला नाही, तर पुढील परीक्षेचा अभ्यास कसा  करयचा? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे.

त्यामुळे निकालाच्या प्रतीक्षेत असलेले संतप्त लॉ चे विद्यार्थी या आठवड्यात परीक्षा विभागाला घेराव घालणार आहेत.

दुसरीकडे 15 दिवसात निकाल लावू, असं आश्वासन विद्यापीठ प्रशासनाने दिलं होतं, त्यालाही महिना उलटणार आहे.

नुकतंच मुंबई विद्यापीठाला डॉ. सुहास पेडणेकर यांच्यारुपी नवा कुलगुरु मिळाला आहे. त्यांच्यासमोर या निकालासह, परीक्षा प्रक्रियेत सुसूत्रताआणण्याचं आव्हान आहे.

संबंधित बातम्या
कोणतंही सेलिब्रेशन न करता काम करणार : कुलगुरु

डॉ. सुहास पेडणेकर मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरु