ठाणे : अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संस्थेमध्ये एक महाराष्ट्राचा मुलगा भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. अक्षत मोहिते असे त्याचे नाव आहे. अक्षयनं तयार केलेल्या स्पेस सेटलमेंट म्हणजेच अंतराळात राहण्यात्या प्रकल्पाची नोंद नॅशनल स्पेस सोसायटीनं घेतली आहे. त्यानं आपल्या प्रकल्पाला सॅक्झीमो हे नाव दिलं आहे.
केवळ 10 दिवसात अक्षतने हा प्रकल्प बनवला आहे. जगभरातून यासाठी मुलांची निवड करण्यात आली आहे. तर भारतातून केवळ 4 मुलांची यासाठी निवड करण्यात आली आहे.
नासाचे शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांच्या एका सेमिनारमधून प्रेरित होऊन केवळ 10 दिवसात त्याने हा प्रकल्प बनवला आहे. त्याने बनवलेल्या प्रकल्पाचे सादरीकरण 24 ते 27 मे रोजी अमेरिकेच्या लॉस एंजल्स होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अंतराळ विकास परिषदेतील पोस्टर सेशनमध्ये होणार आहे. त्यासाठी त्याला नासकडून बोलावणे आले आहे. याठिकाणी जगभरातून स्पर्धक येणार असून, भारतातून केवळ 4 मुलांची निवड करण्यात आली आहे, ज्यात अक्षत हा एकमेव मराठी मुलगा आहे.
काय आहे प्रकल्प?
स्पेसरुपी शहरामध्ये रहिवाशी आणि औद्योगिक क्षेत्र असून यासाठी लागणारी वीज सौर उर्जा आणि मायक्रोव्हेवद्वारे निर्माण केली जाणार आहे. इंधनासाठी दोन इलेक्ट्रोन यांच्या संयोगातून इंधन निर्मिती केली जाणार आहे. हे स्पेस अंतराळात नेण्यासाठीही हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयुगावरील हायड्राजीन या इंधनाचा वापर केला जाणार आहे. तर इंटरनेटसाठी वायफायऐवजी लाईट इंटरनेट म्हणजेच लायफाय हे तंत्र स्पेसमध्ये वापरले जाणार आहे.
ठाण्यातील अक्षत मोहितेच्या प्रकल्पाची ‘नासा’कडून दखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Apr 2018 11:14 PM (IST)
केवळ 10 दिवसात अक्षतने हा प्रकल्प बनवला आहे. जगभरातून यासाठी मुलांची निवड करण्यात आली आहे. तर भारतातून केवळ 4 मुलांची यासाठी निवड करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -