Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या हिवाळी सत्राच्या 439 परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. हिवाळी सत्राच्या या परीक्षा ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहेत. परीक्षेच्या तारखेसोबतच 84 परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.  


Mumbai University Exam Dates : विद्यापीठाच्या परीक्षा तारीख 


1. बीकॉम सत्र 5 : 26 ऑक्टो. 2023
2. बीए सत्र 5 : 30 ऑक्टो. 2023
3. बीएस्सी सत्र 5 : 30 ऑक्टो. 2023
4. बीएस्सी आयटी सत्र 5 : 24 नोव्हे. 2023
5. बीए एमएमसी सत्र 5 : 24 नोव्हे. 2023
6. बीकॉम फिनांशियल मार्केटस,    
    
बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स, 
बीकॉम अकाऊंटिंग अँड फायनान्स,
बीकॉम इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट,
बीकॉम फिनांशियल मॅनेजमेंट व 
बीकॉम ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सत्र 5 :  1 डिसेंबर 2023


439 परीक्षेच्या तारखा जाहीर 


विद्यापीठ दरवर्षी चार विद्याशाखांच्या 500 पेक्षा जास्त परीक्षा घेत असते. विद्यापीठाने 2023-24 च्या हिवाळी सत्राच्या मानव्य विद्याशाखेच्या एकूण 68 परीक्षा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या 63 परीक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेच्या 240 परीक्षा आणि आंतरविद्याशाखेच्या 68 अशा एकूण 439 परीक्षेच्या तारखा विद्यापीठाने जाहीर केल्या आहेत. 


84 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर 


परीक्षेच्या तारखेसोबतच 84 परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आले आहे. इतर परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात करण्यात येईल.


परीक्षा विभागातील परीक्षा व निकाल विभागाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाणे आणि त्यांच्या विभागाने या परीक्षांच्या तारखांचे वेळापत्रक तयार केले असून ते तयार करताना त्या त्या विद्याशाखांचे 90 दिवसांचे सत्र, सुट्ट्या आणि इतर विविध व्यावसायिक परीक्षा याचाही विचार करून या तारखांचे वेळापत्रक तयार केले आहे.


ही बातमी वाचा: