मुंबई: मुंबई विद्यापीठातील निकालांचा घोळ अजूनही सुरुच आहे. कारण मुंबई विद्यापीठातच पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अनेक विषयांमध्ये चक्क शून्य गुण देण्यात आले आहेत. आज पत्रकारिता आणि संवादशास्त्र विभागाचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यातल्या अनेक विद्यार्थ्यांना हा अनुभव आला आहे. विशेषतः गेल्या वर्षी किंवा सेमिस्टरला अव्वल आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना भोपळा देऊन नापास करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच निकालांना दिरंगाई झाली आणि त्यानंतर आता निकालांच्या वैधतेवरच प्रश्न निर्माण झाला आहे.