मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवकांनी ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तातडीची भेट घेतली. यावेळी नगरसेवकांनी आपल्या अडचणी उद्धव ठाकरेंसमोर मांडल्या.


कल्याण-डोंबिवलीतील विकासकामांसाठी महापौरांनाच निधी मिळत नसल्यानं नगरसेवकांनी थेट मातोश्रीवरच धाव घेतली आहे. महापौर आणि पालकमंत्र्यांना अधिकार मिळत नसल्याने नगरसेवकांमध्ये बरीच नाराजी आहे. त्यामुळेच त्यांनी याबाबत उद्धव ठाकरेंची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याच आवाहन केलं आहे.

दरम्यान, या बैठकीत उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांची बरीच चर्चा केली. तसचे उद्धव ठाकरे पुढील आठवड्यात कल्याण-डोंबिवलीमध्ये येणार असून यावेळी आयुक्त, पालकमंत्री आणि नगरसेवकांमध्ये चर्चा घडवून आणणार असल्याचं समजतं आहे.