पेपर आज सकाळी 11 वाजता असताना अद्याप अनेक विद्यार्थ्यांना हॉलतिकीटच देण्यात आलेलं नाही. परीक्षांचे हॉलतिकीट वेबसाईटवर उपलब्ध नसल्याची तक्रार अनेक महाविद्यालये आणि विद्यार्थी गेल्या दोन दिवसांपासून करत आहेत.
मात्र, विद्यापीठाने याची कोणतीही दखल न घेता, हॉलतिकिटाच्या प्रश्नाबाबत 'एमकेसीएल' ला संपर्क करावा, असं म्हणत हात झटकले आहेत. या गोंधळामुळे अनेकांना आज सकाळी परीक्षेच्या 1 तास अगोदर हॉलतिकीट महाविद्यालयातून देण्यात आली.
दरम्यान काही विद्यार्थ्यांना परीक्षा सुरु झाली तरी हॉलितिकीट मिळालं नाही. परिणामी आसन क्रमांकानुसार विद्यार्थ्यांना बसवण्यात आलं. त्यामुळे आम्ही अभ्यास करावा, की हॉलतिकीट बाबत तक्रारी करत बसाव्यात? असा सवाल संतप्त विद्यार्थ्यांनी केला आहे.