मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फूटओव्हर ब्रिजवरील फेरीवाल्यांना  येत्या 15 दिवसात हटवा. जर रेल्वेने ही कारवाई केली नाही, तर सोळाव्या दिवशी माझी माणसं म्हणजे मनसैनिक त्यांना हटवतील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाला दिला. राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मनसेने आज 'संताप मोर्चा'चं आयोजन केलं होतं. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट असा भव्य मोर्चा काढून राज ठाकरे यांनी आपलं निवेदन रेल्वे प्रशासनाला दिलं. यानंतर राज ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी चर्चगेटजवळ राज ठाकरे यांच्या भाषणासाठी दोन ट्रक आणले होते. त्यावरच उभं राहून राज ठाकरे यांनी भाषण केलं. 15 दिवसांचा अल्टिमेटम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनासह भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. रेल्वे स्टेशन परिसरातले फेरीवाले येत्या 15 दिवसात हटवले नाही, तर मनसे रस्त्यावर उतरुन मनसे स्टाईलनं फेरीवाल्यांना हटवेल असा इशारा राज यांनी यावेळी दिला. बुलेट ट्रेनला विरोध कायम यावेळी राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेनला विरोध कायम असल्याचं ठणकावून सांगितलं. सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केल्याने त्यांना रेल्वेमंत्रीपदावरुन हटवल्याचा आरोप राज यांनी केला. तसंच बुलेटट्रेनला पहिल्यांदा विरोध करणारा माणूस मीच होतो, नंतर बाकीचे पोपट बोलायला लागले, असं राज म्हणाले. मूठभर लोकांचं कर्ज देशाने का भरायचं? बुलेट ट्रेनचा लाभ काही लोकांनाच होणार आहे. तो होईल की नाही याबाबतही शाश्वती नाही. मोदींचा जुना व्हिडीओही त्याबाबत सांगून गेला. मग मूठभर लोकांसाठी बुलेट ट्रेनच्या कर्जाची परतफेड संपूर्ण देशाने का करायची? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. मोदींनी फसवलं याशिवाय राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. मोदी आणि भाजपने देशातल्या जनतेला फसवलं, त्यामुळं मोदी सरकारच्या सगळ्या चुकीच्या धोरणांना विरोध दर्शवा, असं राज यांनी उपस्थितांना आवाहन केलं. मोदी खोटारडे व्यक्ती म्हणून मोदींशी देणंघेणं नाही, पण ते आधी एक बोलत होते, आता एक बोलत आहेत. लोक सांगतात की मोदींचा आवाज ऐकायला आला की टीव्ही बंद करावासा वाटतो. इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान पाहिला नाही, असं राज ठाकरे म्हणाले. न्यायाधीश, संपादकांना आवाहन यावेळी राज ठाकरे यांनी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यांच्या न्यायाधीशांना, तसंच देशभरातील संपदकांना आवाहन करुन, सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याची मागणी केली. राज म्हणाले, “न्यायाधीशांना विनंती आहे, सरकारच्या नादी लागून निर्णय घेऊ नका, सरकार बदलत असतं, योग्य निर्णय घ्या” तर माध्यमांनी आणि संपादकांनी चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवावा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

राज ठाकरे यांचा 'संताप मोर्चा' LIVE UPDATE

3.05. PM राज ठाकरे यांचं भाषण संपलं आजचा मोर्चा शांततेत, बदल झाला नाही तर पुढचा मोर्चा शांततेत नसेल न्यायाधीशांना विनंती, सरकारच्या नादी लागून निर्णय घेऊ नका, सरकार बदलत असतात, योग्य निर्णय घ्या व्यक्ती म्हणून मोदींशी देणंघेणं नाही, पण ते आधी एक बोलत होते, आता एक बोलत आहेत लोक सांगतात की मोदींचा आवाज ऐकायला आला की टीव्ही बंद करावासा वाटतो  - राज ठाकरे इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान पाहिला नाही, आधी वेगळं बोलतो, आता वेगळं बोलतो : राज ठाकरे मूठभर लोकांसाठी बुलेट ट्रेनच्या कर्जाची परतफेड संपूर्ण देशाने का करायची? मूठभर लोकांसाठी बुलेट ट्रेनच्या कर्जाची परतफेड संपूर्ण देशाने का करायची?  - राज ठाकरे बुलेटट्रेनला पहिल्यांदा विरोध करणारा माणूस मीच होतो, नंतर बाकीचे पोपट बोलायला लागले बुलेट ट्रेनला विरोध केल्याने सुरेश प्रभूंना रेल्वेमंत्रीपदावरुन हटवलं  - राज ठाकरे दोन-चार लोक देश चालवतायेत, बाकीच्यांना काही कळत नाही का?  - राज ठाकरे माझ्यासह या देशाने मोदींवर विश्वास टाकला, पण विश्वासघात झाला, म्हणून जास्त राग : राज ठाकरे अमित शाह म्हणतात चुनावी जुमला, म्हणजे तुम्ही जनतेला फसवताय - राज ठाकरे नितीन गडकरी म्हणतात, अच्छे दिन म्हणजे घशात अडकलेलं हाडूक, ते त्रास देतंय, म्हणजे अच्छे दिन येणार नाहीत - नवीन सरकार येतं, नवीन आशावाद दाखवतं आणि पुन्हा माणसं मरतात : राज ठाकरे महिलांसाठी गाड्या वाढवा सांगितलं तर अधिकारी लिहून घेत होते, जसं आम्ही काही नवं सांगितलं, तुम्हाला नाही कळत? किड्या-मुंग्यांसारखी माणसं मरतायत आणि यांच्या उच्चस्तरीय बैठका काय करायच्या? रेल्वे स्टेशनवरुन 15 दिवसात फेरीवाल्यांना हटवा, अन्यथा माझी माणसं त्यांना हटवतील : राज ठाकरे आजचा मोर्चा हा रेल्वेपुरता मर्यादित नाही सरकार बदललं तरी परिस्थिती जैसे थे म्हणून माझा संताप मेट्रो ऐकलं बरं झालं, मित्रो ऐकलं असतं तर कुणी आलं नसतं : राज ठाकरे 2.40 PM राज ठाकरे यांचं भाषण सुरु कोणत्याही परिस्थितीत बुलेट ट्रेन होऊ देणार नाही - अविनाश अभ्यंकर 2.25 PM अविनाश अभ्यंकर यांचं भाषण सुरु बुलेट ट्रेन सोडा, मुंबईतून कोल्हापूरला जाण्याचे वांदे करु, संदीप देशपांडे यांचं चंद्रकांत पाटलांना आव्हान सोशल मीडियावर लिहिणाऱ्यांवर सरकार नोटीस काढतं, पण आजच्या मोर्चाला जमलेली गर्दी, ही जनतेची सरकारला नोटीस आहे - संदीप देशपांडे मुंबईचं स्पिरीट नाही, तर धमक दाखवायला हा मोर्चा - संदीप देशपांडे सरकार तुमचं असेल, पण हे पोलीस आमचे आहेत - संदीप देशपांडे 2. 20 PM  संदीप देशपांडे यांचं भाषण सुरु
2.19 PM  राज ठाकरे रेल्वे मुख्यालयात दाखल 2.15 PM प्रचंड गर्दीमुळे राज ठाकरेंना रेल्वे मुख्यालयात जाण्यास अडथळा 2.10 PM राज ठाकरे रेल्वे मुख्यालयाजवळ पोहोचले 2.00 PM राज ठाकरे यांचा संताप मोर्चा चर्चगेट स्टेशनजवळ पोहोचला, शिष्टमंडळासोबत राज ठाकरे चर्चगेट स्टेशन मुख्यालयात जाणार 1.47 PM संताप मोर्चात मनसैनिकांचा मोठी गर्दी 1.42 PM राज ठाकरेंभोवती मनसैनिकांचं कडं, मनसेचा विराट मोर्चा चर्चगेटकडे रवाना
1.27 PM राज ठाकरे मेट्रो सिनेमाजवळ पोहोचले, मनसेच्या मोर्चाला सुरुवात 1.17 PM राज ठाकरे गिरगाव चौपाटीजवळ पोहोचले 12.59 PM शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि उर्वशी ठाकरे मेट्रो सिनेमाजवळ दाखल 12.55 PM राज ठाकरेंच्या भाषणासाठी मंच सज्ज, ट्रकवर उभं राहून राज ठाकरे संबोधित करणार
12.38 राज ठाकरे वरळी सेंच्युरी मिल परिसरात दाखल, मेट्रो सिनेमाकडे कूच 12. 25 मनसैनिकांचा सरकारविरोधात संताप
12.20 PM राज ठाकरेंची पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे मेट्रो सिनेमाकडे रवाना 12.08 PM  हा मोर्चा सर्वसामान्यांसाठी, यामध्ये राजकारण नाही, भाजपने आम्हाला राजकारण शिकवू नये : संदीप देशपांडे 12.00 PM मोर्चासाठी अमित ठाकरे मेट्रो सिनेमाकडे रवाना PHOTO: संताप मोर्चासाठी मनसैनिकांची गर्दी 11.50 AM राज ठाकरे मेट्रो सिनेमाकडे रवाना 11. 45 AM मनसेच्या मोर्चाला सुरुवात 11.10 AM  थोड्याच वेळात मनसेच्या मोर्चाला सुरुवात 10.55 AM  राज ठाकरे 11 वाजता कृष्णकुंजवरुन मोर्चासाठी निघतील : अनिल शिदोरे 10.45 AM  राज ठाकरे यांच्या मोर्चाला मराठी सेलिब्रिटींचाही पाठिंबा, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशीसह दिग्गज कलाकांरांचं मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन 10.40 AM काही वेळात मनसेचा रेल्वेविरोधात धडक मोर्चा, मनसैनिकांची दक्षिण मुंबईकडे कूच, पोलिसांचा चोख बंदोबस्त 10.34 AM मनसैनिकांची सरकारविरोधात घोषणाबाजी 10.30 AM मनसेच्या मोर्चाला अजूनही परवानगी नाही 10.15 AM विविध जिल्ह्यातून मनसैनिक मुंबईत 10.07 AM  राज ठाकरे ट्रकवर उभं राहून भाषण करणार 10.05 AM मोर्चासाठी मनसैनिकांची मेट्रो सिनेमाजवळ जमण्यास सुरुवात 10.00 AM मनसेच्या संताप मोर्चा काही वेळातच सुरु होणार, पोलिसांची अजून परवानगी नाही, मात्र मनसे मोर्चावर ठाम राज ठाकरे ट्रकवर उभं राहून भाषण करणार! https://twitter.com/vaibhavparab21/status/915801861445128192 सोशल मीडियातून आवाहन मोर्च्यात सहभागी होण्यासाठी मनसेनं सोशल मीडियातूनही आवाहन केलं आहे. हा मोर्चा फक्त रेल्वे प्रशासनाविरोधात नाही तर इतर विषयांबाबतही असल्याचं मनसेनं म्हटलं आहे. सध्या देशात एक अघोषित आणीबाणी आहे आणि त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे, अशी भूमिका मनसेनं घेतली आहे. ‘सोन्यासारखी सत्ता जनतेने यांच्या हातात दिली, आधीच्या सरकारपेक्षा काही चांगलं घडेल असा आशावाद निर्माण झाला आणि तो त्यांनी इतक्या लवकर उद्धवस्त केला.’ अशी टीकाही मनसेनं सरकारवर केली आहे. मनसेच्या या मोर्चाला आता नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. अद्याप पोलिसांची परवानगी नाही एलफिन्स्टन घटनेच्या निषेधार्थ आणि रेल्वेच्या विविध प्रश्नावर आज चर्चगेट येथे मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, अद्याप मनसेच्या या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. दरम्यान, परवानगी नसतानाही मोर्चा काढण्यावर मनसे ठाम आहे. त्यामुळं आता आज नक्की काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मोर्चा कसा असेल?
  • सकाळी 11.30 वाजता मेट्रो सिनेमागृह चौकात राज ठाकरेंचं आगमन होईल
  • राज ठाकरे आल्यानंतर मोर्चा सुरु होईल
  • महर्षी कर्वे रोड मार्गे मोर्चा रवाना होईल
  • चर्चगेटच्या पश्चिम रेल्वे मुख्यालयजवळ मोर्चा येईल
  • राज ठाकरे आणि विविध रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात जातील
  • मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतील
  • चर्चेनंतर राज ठाकरे मोर्चेकरांना संबोधित करतील
मोर्चात सहभागी व्हा, मनसेकडून आवाहन रेल्वेच्या प्रश्नावर मनसेकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले असून, सोशल मीडियावरही फोटो शेअर करुन मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

Raj Thackeray(MNS) Mumbai Rally- एबीपी माझा लाईव्ह स्ट्रीमिंग

मनसेचा संताप मोर्चा लाईव्ह स्ट्रिमिंग संबंधित बातम्या मनसेचा आज संताप मोर्चा, मात्र अद्याप पोलिसांची परवानगी नाहीच! असा असेल राज ठाकरेंच्या नेतृत्त्वातील मुंबईतील महामोर्चा ! मनसेच्या ‘संताप मोर्चा’ला अद्यापही पोलिसांची परवानगी नाही!