त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोर्चाच्या सुरुवातीचं ठिकाण असलेल्या मेट्रो सिनेमाकडे कूच केली आहे. एल्फिन्स्टन दुर्घटनेचा निषेध म्हणून राज मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट मुख्यालय असा मोर्चा काढणार आहेत.
अंदाजे अकरानंतर मोर्चाला सुरुवात होणार आहे. चर्चगेट मुख्यालयाला पोहोचल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांशी एक शिष्टमंडळ चर्चा करुन आपल्या मागण्यांचं निवेदन देईल. यानंतर चक्क दोन ट्रकवरच स्टेज बांधण्यात येणार असून त्या ट्रकवरुनच राज ठाकरे आंदोलकांना संबोधित करणार आहेत.
LIVE UPDATE: मनसेचा संताप मोर्चा
एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील पुलावर चेंगराचेंगरी होऊन 23 प्रवाशांचा मृत्यू झाला. यानंतर राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाविरोधात दंड थोपटत आक्रमक पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत मुंबई लोकल सुरक्षित होत नाही., तोपर्यंत बुलेट ट्रेन होऊ देणार नाही., असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अद्याप पोलिसांची परवानगी नाही
एलफिन्स्टन घटनेच्या निषेधार्थ आणि रेल्वेच्या विविध प्रश्नावर आज चर्चगेट येथे मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे.
मात्र, अद्याप मनसेच्या या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. दरम्यान, परवानगी नसतानाही मोर्चा काढण्यावर मनसे ठाम आहे. त्यामुळं आता आज नक्की काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मोर्चा कसा असेल?
- सकाळी 11.30 वाजता मेट्रो सिनेमागृह चौकात राज ठाकरेंचं आगमन होईल
- राज ठाकरे आल्यानंतर मोर्चा सुरु होईल
- महर्षी कर्वे रोड मार्गे मोर्चा रवाना होईल
- चर्चगेटच्या पश्चिम रेल्वे मुख्यालयजवळ मोर्चा येईल
- राज ठाकरे आणि विविध रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात जातील
- मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतील
- चर्चेनंतर राज ठाकरे मोर्चेकरांना संबोधित करतील
मोर्चात सहभागी व्हा, मनसेकडून आवाहन
रेल्वेच्या प्रश्नावर मनसेकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले असून, सोशल मीडियावरही फोटो शेअर करुन मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
Raj Thackeray(MNS) Mumbai Rally- एबीपी माझा लाईव्ह स्ट्रीमिंग
संबंधित बातम्या
मनसेचा आज संताप मोर्चा, मात्र अद्याप पोलिसांची परवानगी नाहीच!
असा असेल राज ठाकरेंच्या नेतृत्त्वातील मुंबईतील महामोर्चा !
मनसेच्या ‘संताप मोर्चा’ला अद्यापही पोलिसांची परवानगी नाही!