मुंबई : 21 ऑक्टोबर रोजीची विधानसभा निवडणूक मतदान लक्षात घेता परीक्षा विभाग मुंबई विद्यापीठाने वेळापत्रकात बदल केला आहे. 21 आणि 22 ऑक्टोबर या दोन तारखांच्या नियोजित परीक्षांचे फेरनियोजन केले आहे. जेणेकरून मतदान प्रक्रिया आणि परीक्षांचे वेळापत्रक या दोन्ही जबाबदारी विद्यार्थ्यांना वेळेचे योग्य नियोजन करून पार पडता येतील. 21 आणि 22 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी मुंबई विद्यापीठाची एकही परीक्षा नियोजित केलेली नाही.
यानुसार, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या 22 परीक्षांचे एकूण 60 पेपर्स, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या 22 परीक्षांचे 57 पेपर्स, मानवताशास्त्र शाखेच्या 11 परीक्षांचे 165 पेपर्स तसेच आंतरविद्या शाखेच्या 13 परीक्षांचे 21 पेपर्स याचे फेरनियोजन केले आहे. या अनुषंगाने एकूण 68 परीक्षांचे 303 पेपर्सच्या परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत.
21 आणि 22 ऑक्टोबर या दोन तारखांना ज्या विषयांच्या परीक्षा होत्या, त्या दोन दिवसाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने, नवीन सुधारित परीक्षांचे वेळापत्रक मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी सदर सुधारित वेळापत्रकाचे अवलोकन करून परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन करावे असे आवाहन डॉ.विनोद पाटील संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी केले आहे.
निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा वेळापत्रकात बदल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Sep 2019 04:29 PM (IST)
जेणेकरून मतदान प्रक्रिया आणि परीक्षांचे वेळापत्रक या दोन्ही जबाबदारी विद्यार्थ्यांना वेळेचे योग्य नियोजन करून पार पडता येतील. 21 आणि 22 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी मुंबई विद्यापीठाची एकही परीक्षा नियोजित केलेली नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -