मुंबई :  मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  या नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.


आजपासून प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी 


mum.digitaluniversity.ac  या संकेतस्थळावर  सुरू करण्यात येत आहे. हेल्पलाईन क्रमांक सुद्धा या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.  शिवाय प्रवेश प्रक्रियेचे पुढील वेळापत्रक स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.



कसे असेल प्रवेश पूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक 



  • अर्ज विक्री (ऑनलाईन/ ऑफलाईन) – 9 जून ते 20 जून 2022 (1 वाजेपर्यंत)

  • प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – 9 ते 20  जून 2022 (1 वाजेपर्यंत)

  • ऑनलाईन फॉर्म सादर करण्याची तारीख – 10 ते 20  जून 2022 (1 वाजेपर्यंत)


ऑनलाईन अर्ज कसा करावा?



  •  विद्यार्थ्यांन स्वतःबद्दलची माहिती भरुन नोंदणी करणे

  • एकदा अचुक माहिती भरल्यावर दाखल केलेल्या मोबाईल क्रमांकावर युझर आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल.

  • युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त होताच विद्यार्थ्यांने सर्वप्रथम स्वतःबदलची माहितीची खातरजमा करुन पासवर्ड बदलण्याची मुभा देण्यात आली आहे.

  • विद्यार्थ्याला देण्यात आलेल्या युजरआयडी आणि पासवर्ड किवा बदलेल्या पासवर्डच्या मदतीने सर्वप्रथम स्वतःबद्दलची माहिती, शैक्षणिक गुणवत्ता आदी माहिती भरावयाची आहे. 

  • त्यानंतर स्कॅन केलेला अद्ययावत फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे.

  • Confirm Profile वर क्लिक करून माहितीची खातरजमा करता येईल.

  • ऑनलाईन प्रवेश नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये नमुद केलेले शिक्षणक्रम विद्यार्थ्याने निवडायचे आहेत. सोबतच विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालये त्यांनी निवडायचे आहेत.


ऑनलाईन अर्ज भरताना खालील बाबींकडे लक्ष द्या



  • प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी करुन माहिती पुस्तिकेनुसार विषय व विषय समुहाप्रमाणेच विषय निवडणे बंधनकारक असणार आहे.

  • प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी ही मल्टी कॉलेजेस, मल्टी कोर्स (प्रोग्राम) साठी करता येईल.

  • विद्यार्थ्यांनी शिक्षणक्रम निहाय नोंदणी अर्जाची प्रत काढून ती संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या विहित प्रक्रियेसाठी योग्य त्या दस्ताऐवजासह सादर करावयाची आहेत.

  • विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिका सोबत ठेवाव्यात.

  • विद्यार्थ्यांच्या शिक्षणक्रमांचे विषय अंतिम करण्याचे  अधिकार महाविद्यालयांच्या प्राचार्यांना असतील याची नोंद घ्यावी.

  •  स्वायत्त महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेबाबतचे नियम व अधिकार हे विद्यापीठ व शिखर संस्थांच्या नियमास अधीन राहून महाविद्यालयांच्या प्रचलित नियमाप्रमाणे असतील.

  • प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी ही नमूद केलेल्या कालावधीत होणे गरजेचे आहे.

  •  विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्जाची प्रत असल्याशिवाय महाविद्यालयात तो प्रवेश घेऊ शकणार नाही. प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचा विद्यार्थ्यांना


 फायदा


प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीचा विद्यार्थ्यांना फायदा होत असून या प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्याला पीआरएन नंबर तसेच परिक्षेचा फॉर्म भरतांना सर्व अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांकडे असल्यामुळे हॉलतिकिट आणि गुणपत्रिका ऑनलाईन माध्यमाने उपलब्ध करुन दिली जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पात्रता आणि नोंदणीची प्रक्रिया अधिक अधिक जलद गतीने व सुलभरित्या केली जाते.