मुंबई: डोंबिवली एमआयडीसीत केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटानंतर राज्य सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

 

पुढील 8 दिवस केमिकल कंपन्या बंद ठेवण्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांनी जाहीर केला. तर लोकवस्ती शेजारीत असलेल्या केमिकल कंपन्यांचा धोका लक्षात घेता, अशा कंपन्यांच डोंबिवलीतून स्थलांतरित करण्यासाठी धोरण आखू, असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज चर्चा करणार असल्याचं देसाईंनी सांगितलं.

 

भीषण स्फोटाने डोंबिवली हादरली

डोंबिवली एमआयडीसीत गुरुवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास झालेल्या स्फोटात मृतांचा आकडा पाचवर पोहचला आहे. तर १४० जण जखमी झाले आहेत. डोंबविली एमआयडीसीतल्या प्रोबेस एन्टरप्रायजेस या केमिकल बनवणाऱ्या कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला.



स्फोट इतका भीषण होता की ५ किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरुन गेला. परिसरातल्या इमारतींच्या, गाड्यांच्या काचा फुटल्या. टपऱ्यांवरील पत्रे उडाले, तर शेजारील इतर केमिकल कंपन्याही उद्ध्वस्त झाल्या.

 

प्रोबसेच्या शेजारीही केमिकल कंपन्या असल्याने आग पसरत गेली. त्यामुळे लागलीच हा परिसर रिकामा करण्यात आला. तसंच इथला वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला.

 

या स्फोटानं प्रोबेस एन्टरप्रायजेसची 3 मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालीही अनेक कर्मचारी दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.



बॉयलरमधल्या स्फोटामागचं नेमकं कारणं अद्याप समोर आलेलं नाही.

 

स्फोटातल्या जखमींवर डोंबिवलीतल्या विविध खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. आग विझवण्यासाठी डोंबिवलीसोबतच कल्याण, भिवंडी, उल्हासनगरमधून अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या.

 

डोंबिवलीच्या विविध हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार

शास्त्री नगर 16 ,

शिवम 22

हर्डीकर 5

स्पर्श 2

आर आर हॉस्पिटल 5

एम्स 17

नेपचून 6

आयकॉन 60

आश्रय 4

संबंधित बातम्या


डोंबिवलीत केमिकल कंपनीत स्फोट, चौघांचा मृत्यू


PHOTO: डोंबिवलीत केमिकल कंपनीत भीषण स्फोट, धूर आणि काचांचा खच