मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर, पाहा कुठे-कुठे मुसळधार
एबीपी माझा वेब टीम | 27 Aug 2016 01:58 AM (IST)
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात पहाटेपासून पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून उसंत घेतलेल्या पावसाने दोन दिवसांत पुन्हा हजेरी लावली आहे. मुंबई शहर, उपनगरासह नवी मुंबईतही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव या पश्चिम उपनगरांसह भांडुप, विक्रोळी, मुलुंडमध्ये पावसाची बॅटिंग पाहायला मिळत आहे. दादर, माटुंगा, परळमध्येही पहाटेपासून पाऊस सुरु आहे. दुसरीकडे नवी मुंबई परिसरातही मुसळधार पाऊस आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी भागातही पावसाला सुरुवात झाली आहे.