मुंबई शहर, उपनगरात पावसाचा जोर, नवी मुंबई परिसरातही जोरदार पावसाची हजेरी


 

हेडलाईन्स :

 

1. शनी शिंगणापूरनंतर हाजी अलीत महिला प्रवेशाच्या लढ्याला यश, हायकोर्टानं महिलांसाठी मझारचे दरवाजे उघडले, हाजी अली ट्रस्ट सुप्रीम कोर्टात जाणार

--------------------

2. काश्मीरप्रश्नी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती आज पंतप्रधान मोदींना भेटणार, हिंसाचारामुळे आतापर्यंत 6 हजार 400 कोटींचं नुकसान

--------------------

3. कांद्याला प्रतिक्विंटल शंभर रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव, केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी पन्नास टक्के भार उचलणार, 3 लाख शेतकऱ्यांना फायदा

------------------------

4. कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या टोलमुक्तीसाठी नितेश राणे आक्रमक, खालापूर टोलनाक्यावर स्वाभिमानचे कार्यकर्ते रस्त्यावर, जड वाहनांना प्रवेशबंदी

-----------------------

5. कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, उस्मानाबादमध्ये मराठा समाजाचा विराट मोर्चा, अॅट्रॉसिटी कायद्याच्या फेरविचाराची मागणी

---------------------

6. ठाणे पालिका शाळेतल्या सुरक्षारक्षकाकडून दोन विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण, हलगर्जी करणाऱ्या मुख्याध्यापिकेसह 5 शिक्षक निलंबित

------------------------

7. मध्य प्रदेशातही असंवेदनशीलतेचा कळस, प्रवासादरम्यान महिलेचा मृत्यू, पत्नीच्या मृतदेहासह पतीला अर्ध्या रस्त्यात खाली उतरवलं

-------------

8. व्हॉट्सअॅपचं अनोखं पाऊल, व्हॉट्सअॅपचा मोबाईल नंबर आता फेसबुकसोबत शेअर होणार, शेअर केलेला नंबर सुरक्षित ठेवण्याचा व्हॉट्सअॅपचा दावा