लोकलच्या रेल्वे रुळाला तडे की रुळ कापून नेला?
एबीपी माझा वेब टीम | 26 Aug 2016 04:47 PM (IST)
मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचं समोर आलं होतं. पण रुळाचे फोटो पाहिल्यानंतर रुळाला तडे गेले की रुळ कापून नेला, असा संशय व्यक्त केला जात आहे. दादर-माटुंगा दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे कामावरुन परतणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड झाले होते. परंतु एबीपी माझाच्या हाती लागलेले फोटो नीट पाहिले तर असंच दिसतंय की, रेल्वे रुळाचा काही इंचाचा तुकडा कापून नेला आहे.