महाराष्ट्र सदन प्रकरणातील चमनकर बिल्डरचं एसआरएचं कंत्राट रद्द
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2017 11:32 PM (IST)
मुंबई : दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाचं बांधकाम करणाऱ्या चमनकर बिल्डरांना एसआरएनं मोठा धक्का दिला आहे. चमनकरांकडून मुंबईतील एसआरएचं कंत्राट काढून घेण्यात आलं आहे. चमनकरांना मुंबईच्या अंधेरी आरटीओ परिसरात एसआरएचं कंत्राट देण्यात आलं होतं. मात्र ते रद्द करण्यात आल्याची माहिती भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी दिली. महाराष्ट्र सदनाचं बांधकाम करण्याच्या मोबदल्यात चमनकर बिल्डरला मुंबईच्या एसआरए प्रकल्पासाठी एफएसआय देण्यात आला होता, अशीही माहिती समोर येत आहे. त्यासाठी चमनकर बिल्डरनं छगन भुजबळांना पैसे दिल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ तुरुंगाची हवा खात आहेत.