मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चार विशेष लोकल गाड्या चालविणार आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी 2023 च्या मध्यरात्री या विशेष चार गाड्या चालवण्यात येणार आहेत. रेल्वेच्या  सेंट्रल आणि हार्बर  लाईनवर या गाड्या चावण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. याबरोबरच वेस्टर्न रेल्वे याच दिवशी आठ विशेष लोकल गाड्या चालवणार आहे. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईत मोठी गर्दी होते. या गर्दीमुळे प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आलाय. 


Central Railway : सेंट्रल लाईन


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून विशेष ट्रेन 31 डिसेंबर 2022  आणि 1 जानेवारी  2023 च्या मध्यरात्री 1.30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे  तीव वाजता पोहोचेल. तसेच कल्याण येथून विशेष ट्रेन 31 डिसेंबर 2022 आणि 1 जानेवारी 2023 च्या मध्यरात्री दीड वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तीन वाजता पोहोचेल.


Harbour Railway : हार्बर लाइन


विशेष ट्रेन 31 डिसेंबर 2022 आणि 1 जानेवारी 2023 च्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दीड वाजता सुटेल आणि 2.50 वाजता पनवेल येथे पोहोचेल. तसेच पनवेल येथून विशेष ट्रेन 31 डिसेंबर 2022 आणि 1 जानेवारी 2023 च्या मध्यरात्री दीड वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 02.50 वाजता पोहोचेल.


Western Railway : वेस्टर्न रेल्वे


पश्चिम म्हणजेच रेल्वे 31 डिसेंबर 2022 आणि 1 जानेवारी 2023 च्या मध्यरात्री प्रवाशांसाठी आठ विशेष लोकल ट्रेन चालवणार आहे. यामध्ये चर्चगेट ते विरार 4 आणि विरार ते चर्चगेट 4 सेवांचा समावेश आहे. नववर्षानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी पाहता रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.


मध्ये रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या सर्व विशेष उपनगरी ट्रेन सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. कोरोना नियमांचे पालन करून प्रवाशांनी प्रवास करावा असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.  


महत्वाच्या बातम्या


मुंबई लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीही स्वतंत्र डबा राखून ठेवा; हायकोर्टात जनहित याचिका