मुंबईत सपाच्या माजी नगरसेविकेची गळफास घेऊन आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 02 Apr 2018 01:12 PM (IST)
नूरजहाँ रफीक शेख ह्या गोवंडीच्या वॉर्ड क्रमांक 137 च्या नगरसेविका होत्या.
मुंबई : समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेविकेने मुंबईत आत्महत्या केली. गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरातील माजी नगरसेविका नूरजहाँ रफीक शेख यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं. त्या 45 वर्षांच्या होत्या. नूरजहाँ शेख यांनी आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. नूरजहाँ रफीक शेख ह्या गोवंडीच्या वॉर्ड क्रमांक 137 च्या नगरसेविका होत्या. त्यांनी प्रभाग समितीचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. त्यांच्या कन्या आयेशा शेख या सध्या नगरसेविका असून गोवंडीतूनच निवडून आल्या आहेत. आपल्या पतीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळेच नूरजहाँ शेख अधिक चर्चेत होत्या. शिवाजीनगर इथल्या स्मशानभूमीत आज संध्याकाळी नूरजहाँ यांचा दफनविधी पार पडणार आहे.