मुंबई : दादरमध्ये शिवसेना आणि मनसेमध्ये पोस्टर वॉर सुरू झालं आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर मनसेनं सेनाभवनासमोर पोस्टरबाजी केली होती. मनसेच्या या पोस्टरबाजीला शिवसेनेनं चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
पोस्टर्सच्या माध्यमातून शिवसेनेनं मनसेवर हल्ला चढवला आहे. शिवसेनेनं मनसेनं केलेल्या टोल आंदोलन, विद्यार्थ्यांना फसवलेलं आंदोलनं, पाकिस्तानी कलाकारांविरोधातील आंदोलन यावर टीका करत थेट राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकांवर हल्लाबोल केला. तर 'राहत्या वॉर्डात निवडून यायचे वांदे आणि जगाला सल्ले द्यायचे यांचे धंदे' असा टोलाही शिवसेनेनं मनसेला लगावला.
शिवसेनेची राज ठाकरेंविरोधात पोस्टरबाजी
- सेंटींगवाले टोल आंदोलन
- विद्यार्थ्यांना फसवलेले रेल्वे आंदोलन
- पाक कलाकार विरोधाच्या नावे खुले आम सेटिंग
- राहत्या वॉर्डात निवडून यायचे वांदे आणि जगाला सल्ले द्यायचे यांचे धंदे
येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात जाहीर केलं होत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मनसेने शिवसेनेला अयोध्या वारीसाठी शुभेच्छा देत राज्यातील काही गंभीर प्रश्नाबाबत काय? थेट प्रश्न पोस्टरद्वारे विचारले होते.
मनसेने शिवसेनेला विचारलेले प्रश्न
- महाराष्ट्राचे रस्ते खड्डे मुक्त होणार का?
- महागाई कमी होणार का?
- महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का?
- बेरोजगारांना रोजगार मिळणार का?
- शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का?
- शेती मालाला हमी भाव मिळणार का?
- महाराष्ट्रातला दुष्काळ संपणार का?
- मोकळ्या जागांवरील अतिक्रमण थांबणार का?
- महापालिकेतील भ्रष्टाचार संपणार का?
- खिशातले राजीनामे बाहेर पडणार का?
संबंधित बातम्या