मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. दादरमधील जागाही शिवसेनेने परत खेचून आणल्या. विशेष म्हणजे बेहरामपाडा या मुस्लीमबहुल भागात शिवसेनेला अनपेक्षित विजय मिळाला. वॉर्ड क्रमांक 96 मध्ये मोहम्मदहलीम मोहम्मदशमिम खान यांचा विजय झाला.


मुंबईच्या वांद्रे पूर्वतील मुस्लीमबहुल बेहरामपाडा हा परिसर सहा मजली झोपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या भागात काँग्रेसचाच कायम वरचष्मा होता. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने एमआयएममधून आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेची ही चाल यशस्वीही झाली.

मोहम्मदहलीम मोहम्मदशमिम खान हे एमआयएममध्ये होते. परंतु तिकीट न मिळल्याने त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली. मुस्लीम उमेदवार असल्याने तसंच यापूर्वी एमआयएमसोबत काम केल्याने बेहरामपाड्यात त्याचा फायदा झाला.

या भागात शिवसेनेला यापूर्वी मुश्किलीने 100 ते 200 मतं मिळत होती. मात्र यावेळीस शिवसेनेने उच्चशिक्षित मुस्लीम तरुणाचा पर्याय बेहरामपाड्यातील जनतेसमोर दिला. त्यामुळे काँग्रेस आणि समाजपादी पाार्टीच्या गडात अर्थात बेहरामपाड्यात पहिल्यांदाच भगवा फडकला.