वीस कोटींची खंडणी मागणारा शिवसेना जि. प. सदस्य अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 15 Mar 2018 03:07 PM (IST)
मुंबईतील पवई भागात असलेल्या एका नामांकित विकासकाकडे 20 कोटींची खंडणी मागण्यात आली होती.
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : मुंबईतील विकासकाकडे 20 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी पुण्यातील शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. मुंबईतील पवई भागात असलेल्या एका नामांकित विकासकाकडे 20 कोटींची खंडणी मागण्यात आली होती. घासाघीस करुन ही रक्कम सहा कोटी इतकी ठरवण्यात आली. त्यापैकी दोन कोटी रुपयांची रक्कम स्वीकारताना खंडणीखोराला पवई पोलिसांनी अटक केली. आरोपी गुलाब विठ्ठल पारखे हे शिवसेनेकडून जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. संबंधित विकासकाकडे ते लायसनिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होते. पवई पोलिसांनी कलम 384 अन्वये पारखेंवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.