शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर आणि अमेय घोले यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांची भेट घेऊन रेडिओ वाहिनीवर कायदेशीर कारवाई करुन अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची मागणी केली आहे.
शिवसेनेकडून आरजे मलिश्कावर टीका करणारं गाणं
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बीएमसीच्या बदनामीचं गाणं 93.5 रेड एफएम या खाजगी वाहिनीने करणं ही निंदनीय गोष्ट असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. सरवणकर आणि घोले यांनी पालिका आयुक्तांकडे पत्र दिलं आहे.
मुंबई, तुला बीएमसीवर भरवसा नाय काय?, आर.जे. मलिश्काचं भन्नाट गाणं
इस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे हे दोन्ही मुख्य रस्ते एमएमआरडीए आणि पीडब्ल्यूडीच्या अखत्यारित असताना त्याचं खापर पालिकेवर फोडल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लोकल ही रेल्वे खात्याशी म्हणजेच केंद्राशी निगडीत असताना त्याचं खापर आपल्यावर फोडल्याचंही पत्रात म्हटलं आहे.